अमेरिकेकडून चीनवर लवकरच मोठ्या कारवाईचे संकेत

4788

कोरोनाव्हायरसच्या मुद्यावर अमेरिका सतत चीनविरूद्ध वक्तव्य करीत आहे. आता अमेरिका चीनविरूद्ध अधिक कारवाईची तयारी करत आहे. व्हाईट हाऊसने याबाबत माहिती दिली आहे, परंतु या कारवाईचे स्वरूप काय असेल याबद्दल काहीही सांगण्यात आले नाही. चीनमधील वुहान शहरातून कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत व्हायरसबद्दल चीनवर प्रश्न विचारत आहेत.

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी केली मॅककेनी यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, “चीनवर आपल्याकडून काय कारवाई होईल हे मला आधीच जाहीर करता येणार नाही.” मात्र हे सांगतानाच अमेरिकेकडून कारवाईची तयारी असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.

दोन्ही देशांमधील कोरोना (कोविड -19) व्यतिरिक्त तणाव वाढण्यामागे इतरही कारणे आहेत. खरे पाहता, चीनने हाँगकाँगमध्ये नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे. अमेरिकन पत्रकारांवर चीनने बंदी घातली आहे. चीनमधील उयगर मुस्लिमांशी झालेल्या व्यवहार आणि तिबेटमधील सुरक्षेबाबत चीनच्या भूमिकेबद्दल अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या