हमजा बिन लादेनचा खात्मा झाल्याची डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती

1067


अल कायदाचा म्होरक्या आणि 9/11 च्या अमेरिकेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेनच्या मुलाचा हमजा बिन लादेनचा खात्मा करण्यात आला आहे, या वृत्ताला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. व्हाईट हाऊसकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. हमजा हा ओसामाचा उत्तराधिकारी होता.

अफगाणिस्तान- पाकिस्तान क्षेत्रात दहशतवादविरोधी मोहिमेत हमजाचा खात्मा करण्यात आल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. मात्र, ही कारवाई नेमकी कधी करण्यात आली, याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. याआधाही हमजाचा खात्मा झाल्याचे वृत्त येत होते. मात्र, आता ट्रम्प यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या