ख्रिश्चनांसाठी उभे ठाकले डोनाल्ड ट्रम्प, कट्टरपंथी मुस्लिमांना आवरा नायजेरियाला सुनावले

नायजेरियात ख्रिश्चन धर्मीयांवर होणाऱ्या अत्याचारामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भडकले आहेत. ’अमेरिका हे अत्याचार मूकपणे बघत बसणार नाही. आम्ही ख्रिश्चन समुदायाला वाचवण्यासाठी तयार आहोत, असे त्यांनी नायजेरियासह इतर देशांना सुनावले आहे.

’टथ सोशल’ या आपल्या मीडिया अकाऊंटवरून ट्रम्प यांनी नायजेरियातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. नायजेरियात कट्टरपंथी इस्लामी संघटना ख्रिश्चनांना लक्ष्य करत आहेत. हजारो ख्रिश्चनांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे नायजेरिया हा आमच्या दृष्टीने ’विशेष चिंताजनक’ देश बनला आहे. जगभरात गेल्या काही दिवसांत 4476 ख्रिश्चन मारले गेले आहेत, त्यातील 3100 एकट्या नायजेरियातील आहेत. अशा पद्धतीने जेव्हा कुठल्याही समुदायाचे हत्याकांड होते, तेव्हा काहीतरी करणे आवश्यक होऊन जाते, असे ट्रम्प म्हणाले.