चीनला टक्कर देण्यासाठी अमेरिका हिंदुस्थानला करणार कॉपी पेस्ट, उचलणार हे पाऊल

mike-pompeo-us

हिंदुस्थानने चीनला वठणीवर आणण्यासाठी त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. डिजिटल युगात अग्रेसर असलेल्या चीनला नामोहरम करण्यासाठी टिक-टॉक सारख्या 59 अॅप्सवर बंदी आणली आहे. याच मार्गावर आता अमेरिका देखील पाऊले टाकण्याच्या विचारात आहे. टिक-टॉक सारख्या अॅप्सवर बंदी आणण्याचा विचार असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी सांगितले. माईक पॉम्पिओ यांनी एका मुलाखतीत ही भूमिका स्पष्ट केली.

अमेरिकेच्या खासदारांनी टिक-टॉक संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. टिक-टॉक सारख्या कंपन्या युझर्सचा डेटा हाताळत असल्याने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकते. चिनी कम्युनिस्ट पक्षाद्वारे नियंत्रित असलेल्या या कंपन्या गुप्तचर कार्यास पाठिंबा आणि सहकार्य करत असल्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली.

चीनमध्ये उपलब्ध नसलेल्या अॅपने जागतिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी चीनपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि चीनपासून स्वतंत्र होण्यावर जोर देत आहेत.

कोरोनाव्हायरसचा उद्रेक, हाँगकाँगमधील चीनची कारवाई आणि जवळपास दोन वर्षांच्या व्यापार युद्धाबद्दल अमेरिकेच्या चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही पॉम्पिओ यांचे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या