पाच मुलांची आई पडली सोळा वर्षाहून लहान तरुणाच्या प्रेमात, लवकरच करणार तिसरे लग्न

प्रेम हे आंधळे असते आणि वय हा फक्त आकडा असतो याचे उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील एक जोडपं आहे. दोनदा घटस्फोट झालेल्या पाच मुलांच्या आईचे सोळा वर्षांहून लहान मुलावर प्रेम जडले. सात वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नात्यावर सोशल मीडियावर टिकाही झाली मात्र त्याचा त्यांच्यावर परिणाम झाला नाही.

द सनच्या वृत्तानुसार, कोरी रे असे या महिलेचे नाव असून ती 39 वर्षांची आहे. कोरीची आधी दोन लग्न झाली आहेत, दोनदा तिचा घटस्फोट झाला असून तिला पाच मुलं आहेत. दोन घटस्फोटानंतर सावरलेल्या कोरीने तिसरे लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मेलव्हिन तिच्या आयुष्यात आला आणि तिचं सगळं आयुष्य बदललं. मेलव्हिन 23 वर्षांचा असून कोरीपेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. मात्र मेलव्हिननच तिचे खरं प्रेम असल्याचे कोरी सांगते. कोरी आणि मेलव्हिन दोघंही एकमेकांच्या भावना समजतात, मेलव्हिनचेही म्हणणे आहे की कोरीच्या भूतकाळाचा त्याच्यावर काहीच फरक पडत नाही. त्याचे तिच्यावर खरे प्रेम आहे.

कोरीने दोघांमधील वयाचे अंतर पाहता मेलव्हिनला त्याच्यापेक्षा लहान मुलीशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र लग्न करेन तर कोरीशीच असाच त्याचा अट्टाहास होता. त्याचं कोरीवर प्रचंड प्रेम असून पुढचं आयुष्य तिच्यासोबत जगण्याचा त्याने निर्णय घेतला आहे. गेली सात वर्षे ती दोघं एमेकांसोबत राहत असून त्यांना दोन मुलं आहेत. टिकटॉकवर काही युजर्सनी कोरी आणि मेलव्हिनला त्यांच्या नात्याबाबत चांगलेच ट्रोल केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या