अल्पवयीन मुलावर महिलेने केला बलात्कार, आता होणार त्याच्या मुलाची आई

एका चौदा वर्षाच्या मुलावर त्याच्यापेक्षा दुप्पट वयाच्या महिलेने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अमेरिकेतील अरकनसास शहरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 1 मार्चला महिलेला अटक केली मात्र त्यावेळी ती महिला पीडित मुलाच्या बाळाची आई होणार असल्याचे समजले. अटकेनंतर काही वेळातच तिला जामीन मंजूर करण्यात आला.

ब्रिटनी ग्रे असे त्या महिलेचे नाव असून तिने एका 14 वर्षाच्या मुलाला फूस लावून त्याच्यावर बलात्कार केला. तब्बल वर्षभर ती त्याच्यावर बलात्कार करत होती. याबाबत ब्रिटनीच्या शेजारच्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर हा धक्कादायक प्रकार सर्वांच्या समोर आला.

पोलिसांनी या प्रकरणी ब्रिटनी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ब्रिटनी सध्या गरोदर असून तिला पाचवा महिना सुरू आहे. तिच्या गर्भातील बाळ हे पीडित मुलाचे आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 एप्रिलला होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या