लंडनपाठोपाठ अमेरिकेत गोळीबार; 11 जखमी, दोघे गंभीर

710

ब्रिटनच्या ऐतिहासिक लंडन ब्रिजवरील गोळीबाराची घटना ताजी असतानाच रविवारी अमेरिकेच्या न्यू ऑरलिन्स शहरात अज्ञाताने केलेल्या अंदाधुंद गोळीबाराने प्रचंड दहशत पसरली आहे. गोळीबारात 11 जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेत दहशतवादी संघटनेचा हात आहे का, याचा तपास केला जात आहे. लंडन ब्रिजवरील गोळीबाराच्या घटनेमागे ‘आयएसआय’ या दहशतवादी संघटनेच्या सहभागाचा संशय वर्तवला गेला होता.

रविवारी न्यू ऑरलिन्स शहरातील फ्रेंच क्वार्टर या उच्च्रभू वस्तीतील कॅनल स्ट्रीटवर गोळीबार झाल्याने अमेरिकेच्या तपास यंत्रणांची प्रचंड धावपळ उडाली. या परिसरात देशी-विदेशी पर्यटकांची प्रचंड वर्दळ असते. घटनास्थळाच्या आवारात काही हॉटेल्स असून तेथे अनेक पर्यटक राहतात. रविवारी हल्लेखोराने पर्यटकांची गर्दी झाल्याचे पाहून अंदाधुंद गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. हल्लेखोरांनी पर्यटकांना टार्गेट करून गोळीबार केला असण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलिसांबरोबरच न्यायवैद्यक पथके दाखल झाली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या