15 हजार फूट उंचीवर विमानाच्या इंजिनाला लागली आग; आपत्कालीन लँडिगमुळे प्रवासी बचावले

अमेरिकेच्या डेनवर विमानतळाहून हवाईकडे जाणारे विमान 15 हजार फूट उंचावर पोहचले असताना विमानाच्या एका इंजिनाला आग लागली. त्यानंतर विमानाचे मोठे भाग जमीनीवर कोसळले. विमानातील प्रवाशांनाही आगीची झळ बसत होती. विमानाने उड्डाण केल्यानंतर 20 मिनिटातच ही घटना घडली. त्यामुळे विमान माघारी वळवत त्याचे डेनवर विमानतळावर आपत्कालीन लँडिग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.

अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सचे विमान शनिवारी दुपारी डेनवरकडून हवाईकडे जात होते. युनायटेड एअरलाइन्सच्या बोइंग 77 विमानाने 231 प्रवाशांना घेत हवाईसाठी उड्डाण केले. उड्डाण झाल्यानंतर 20 मिनिटांनी विमान 15 हजार फूटांच्या उंचीवर असताना विमानाच्या एका इंजिनाला आग लागली. इंजिनात स्फोटाचा आवाज झाल्यावर आग वाढत गेली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

विमानाच्या इंजिनाला आग लागल्याने प्रवाशांनाही त्याच्या झळा जाणवू लागल्या. तसेच विमानाचे मोठे भाग कोसळण्यास सुरुवात झाली. अमेरिकेतील कोलाराडोतील निवासी भागात विमानाचे काही तुकडे कोसळले. त्यामुळे विमान माघारी डेनवरकडे वळवत त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आल्याने प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप आहेत. विमानात 10 क्रू मेंबर्ससह एकून 241 जण होते. ते सर्व सुखरुप असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या