अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मनमोहन सिंग यांच्या धोरणाचे अनुकरण करा, भाजपला घरचा आहेर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनीच देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पी.व्ही.नरसिंह राव यांच्या धोरणांचं अनुकरण करावे, अशी सूचना केली आहे. त्यांचा हा सल्ला म्हणजे एकप्रकारे भाजपला घरचा आहेर असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आर.पी.एन.सिंह यांची सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी अर्थमंत्री सीतारामन यांचे पती प्रभाकर यांनी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाकडे लक्ष वेधत भाजप सरकारकडे आर्थिक नियोजन नसल्याचे सांगितले. देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यात सरकारला आलेल्या अपयशावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी निवडणुकीच्या प्रचारात कलम 370कडे जनतेचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याची टीका सिंह यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या