
सध्याच्या घडीला उन्हाळ्यात केसांमध्ये घाम आल्यावर आपले केस गळण्याचे प्रमाण अधिक वाढते. म्हणूनच या केसगळतीवर मात करण्यासाठी, कोरड्या आणि गळणाऱ्या केसांवर दही लावणे हे खूप हितावह आहे. मुख्य म्हणजे आंघोळीपूर्वी केसांना दही लावल्यास केसगळतीचे प्रमाण खूप कमी होते. याकरता किमान 3 ते 4 चमचे दही आंघोळीपूर्वी केसांना लावल्यास, हलक्या मालिशनंतर अर्धा तास तसेच ठेवावे. त्यानंतर लगेच केस धुवावे. यामुळे केसगळतीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होते. केसांना दही लावताना यामध्ये हवे असल्यास, दह्यात मध, हळद आणि लिंबाचा रस देखील मिसळू शकता. यामुळे केसांना अनेक फायदे होतात. केसांच्या मुळाशी आणि केसांना दही लावल्याने डोक्यातील कोंडा कमी होतो, टाळूची खाज कमी होते, केसांना पोषण मिळते आणि ते मऊ होतात.
केसांसाठी दह्याचे फायदे
दह्यामध्ये प्रथिने, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळतात. ते केसांना लावल्याने केस मऊ आणि चमकदार राहण्यास मदत होते, त्यामुळे केस निरोगी राहतात.
दही केसांना पोषण देण्यास मदत करते. केसांच्या वाढीला चालना देण्याव्यतिरिक्त, केसांच्या मुळाशी पोषण तत्व दही पुरवते.
Hair Care- केसगळती रोखण्यासाठी कांदा आहे वरदान! वाचा सविस्तर
दह्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. आंघोळीपूर्वी केसांवर आणि टाळूवर दही लावल्याने, केसगळती रोखण्यास देखील मदत होते.
केसांना आणि टाळूला दही लावल्याने टाळू स्वच्छ होते आणि बुरशीजन्य संसर्ग टाळण्यास मदत होते.
केसांना दही लावल्याने केसांची उत्तम वाढ होण्यास मदत होते.
दह्यामध्ये प्रोबायोटिक गुणधर्म आढळतात, तसेच ते केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनिंग करण्यास मदत करते. शिवाय दही लावल्याने केसांना नैसर्गिक चमक देखील मिळते.