अंडे का फंडा

147

अंड आरोग्याच्या दृष्टीने पार हिताचे आहे, नियमित अंडे खाल्ल्यास तुम्ही तंदुरुस्त राहाल. महिन्यात किमान १५ अंडी पोटात जायला हवी.

 • अंड्यात प्रथिने, विविध जीवनसत्त्वे, लोह, खनिजे, आयोडिन, झिंक असे घटक असतात. त्यामुळे आहारात समावेश असणे गरजेचे असते.
 • बलकातील कोलीन हा घटक बौद्धिक विकासासाठी फायदेशीर आहे.
 • अंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही होतो.
 • अंड्यामुळे हाडांची मजबुती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्याबरोबरच सौंदर्य राखण्यासही मदत होते.
 • रोज अंडं खाल्ल्याने कार्यक्षमतेत वाढ होते.
 • शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता दूर होते.
 • रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.
 • रोज तीन अंडी खाल्ल्याने दृष्टी सुधारते.
 • अंडी खाल्ल्याने नखं आणि केसांना फायदा होतो.
 • अंडं खाल्ल्याने रक्तदाब वाढण्यापूर्वीच नियंत्रणात राहतो, स्मरणशक्ती वाढते, मानसिक संतुलन टिकून राहते.
 • अंड्यामध्ये ऍण्टि-ऑक्सिडंट्स हा गुणधर्म असल्याने हृदयविकार व कॅन्सरचा धोका टाळण्यास मदत होते.
आपली प्रतिक्रिया द्या