‘बिग बॉस’मधून उषा नाडकर्णी घराबाहेर!

10

सामना ऑनलाईन । मुंबई

‘बिग बॉस’ मराठीच्या घरामधून या आठवडय़ामध्ये आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी यांना घराबाहेर जावे लागले आहे. या आठवडय़ामध्ये स्मिता आणि आऊ डेंजर झोनमध्ये आल्या होत्या. उषाजींना निरोप देताना शर्मिष्ठा, मेघा, पुष्कर, सई, आस्ताद सगळेच खूप भाऊक झाले. उषा नाडकर्णी या आठवडय़ामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्या तेव्हा महेश मांजरेकर यांनी सांगितले की, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आऊ यांची खूप आठवण येईल. या घरामध्ये आता येत्या आठवडय़ामध्ये कोण नॉमिनेट होईल, प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल, आणि कोण घराबाहेर जाईल, हे बघणे रंजक असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या