सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळी यांची चौकशी; ‘या’ दोन चित्रपटांवरून प्रश्न उपस्थित

672

अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्या प्रकरणी वांद्रे पोलीस सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चौकशी करत आहेत. सोमवारी दुपारी 12 वाजता संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. सुशांत सिंह राजपुत यांच्या निधनानंतर आतापर्यंत 28 लोकांची चौकशी करण्यात आली आहे. असे बोलले जात आहे की, ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’मध्ये भन्साळी आधी सुशांत सिंह राजपुतला कास्ट करणार होते. मात्र त्यांनी नंतर या चित्रपटासाठी रणवीर सिंगची निवड केली. संजय लीला भन्साळी यांच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

दरम्यान, 14 जून रोजी सुशांतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गेली 6 महिने तो नैराश्याच्या गर्तेत होता अशी माहिती नंतर समोर आली. मुंबई पोलिसांनी यापूर्वी रिया चक्रवर्ती आणि संजना संघी या अभिनेत्रींची चौकशी केली आहे. तसेच यश राज फिल्म्सची कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा हिची चौकशी केली आहे. आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही चौकशी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या