उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ नाही, नथुरामराज!

428

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली रामराज्य नव्हे, तर ‘नथुरामराज’ सुरू आहे, अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यूपीतील भाजप सरकारवर केली. झाशीतील मोंट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कथित वाळूमाफिया पुष्पेंद्र यादवला खोटय़ा चकमकीत गोळ्या घालून मारल्याचा गंभीर आरोप अखिलेश यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

रविवारी ‘वाळूमाफिया’ पुष्पेंद्र यादवने पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकाने त्याचा ट्रक अडवल्यावर बेछूट गोळीबार केला. त्यात मोंटचे ठाणेदार धर्मेंद्र चौहान हे जखमी झाले. त्यामुळे बचावासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात पुष्पेंद्रचा मृत्यू झाला असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण झाशीचे पोलीस अधीक्षक ओ. पी. सिंग आणि मोंटचे ठाणेदार चौहान यांच्या जबानीत तफावत असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या