
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे बुधवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. लखीमपूर खेरी येथे खासगी बस आणि ट्रकच्या धडकेत 8 जण ठार तर 25 हून अधिक जखमी झाले. त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना लखनौ येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन युद्धपातळीवर मदतकार्य करण्याचे आणि जखमींना योग्य उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शोकाकुल कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत मुख्यमंत्री योगी यांनी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
लखीमपूर खेरी जिल्ह्यातील इसानगर येथे शारदा नदीच्या पुलावर प्रवासी घेऊन जाणारी एक खासगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातात जखमी झालेल्या सुमारे 25 प्रवाशांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये 35-40 लोक होते. अपघात झाला तेव्हा या बसचा वेग खूप जास्त होता.