फोन, कागदपत्रे फाडणे आणि जोरात हसण्यावर बंदी; उत्तर प्रदेश विधानसभेचे नवीन नियम

uttar-pradesh-assembly

उत्तर प्रदेश विधानसभेने नवे नियम संमत केले असून ज्यानुसार सदस्यांना त्यांचे मोबाईल फोन सभागृहात घेता येणार नाहीत, कागदपत्रे फाडता येणार नाहीत किंवा सभापतींकडे पाठ करून उभे राहता येणार नाही किंवा पाठ करून बसता येणार नाही.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या कार्यपद्धती आणि कामकाजाचे नियम, 2023 हे संमत झाल्यानंतर, यूपी विधानसभेच्या 1958 च्या कार्यपद्धती आणि कामकाजाची जागा घेतील.

‘नवे नियम सोमवारी मांडण्यात आले. बुधवारी त्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर ते मंजूर होतील’, असं उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी पीटीआयला सांगितलं.

नव्या नियमांनुसार आमदारांना सभागृहातील कोणतीही कागदपत्रे फाडता येणार नाहीत. भाषण देताना ते गॅलरीत कोणाकडेही बोट दाखवणार नाहीत किंवा त्याची स्तुती करणार नाहीत. आमदारांना सभापतींकडे पाठ करून उभे राहता येणार नाही किंवा पाठ करून बसता येणार नाही. तसेच ते सभागृहात शस्त्रे आणू किंवा दाखवू शकणार नाहीत.

सदस्य धूम्रपान करू शकत नाहीत किंवा ते लॉबीमध्ये मोठ्याने बोलू किंवा हसू शकत नाहीत.

विधानसभेच्या सदस्यांनी (आमदारांनी) सभापतींच्या खुर्चीकडे झुकून आदर दाखवावा आणि सभागृहात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना किंवा त्यांच्या आसनावरून बसताना किंवा उठताना पाठ दाखवू नये, असे हे नियम आहेत.

नवीन नियमांनुसार, राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा कालावधी सध्याच्या 14 दिवसांवरून सात दिवसांवर आला आहे. या व्यतिरिक्त, सदस्यांना कोणतेही साहित्य, प्रश्नावली, पुस्तक किंवा प्रेस टिप्पण्या आत नेण्यास किंवा कार्यवाहीशी संबंधित नसलेल्या स्लिप्स वितरित करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

विधानसभेच्या प्रधान सचिवांच्या वतीने प्रत्येक दिवसाच्या कामाची यादी आमदारांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन उपलब्ध करून द्यावी लागेल.