हिंदुस्थानी लष्काराची माहिती चोरणारे ११ जण अटकेत

28

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने देशविरोधी कारवाईच्या तयारीत असलेल्या ११ जणांना पकडल्याची माहिती दिली आहे. हे लोक पाकिस्तान, बांगलादेश, यूएई आणि नेपाळमधून हिंदुस्थानात आल्याचे कळते.

११ जणांचा एक गट उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणांहून हिंदुस्थानी लष्कराच्या संदर्भातील गोपनीय माहिती अन्य देशात पाठवत होता. जम्मू-कश्मीरच्या लष्करी ठिकाणांवर हे इंटरनेट कॉल करून स्वत: सैन्यातील मोठे अधिकारी असल्याचे सांगायचे. मग सैन्याची महत्वाच्या माहितीबद्दल प्रश्न विचारायचे. सैन्यातील अधिकाऱ्यांना त्यांच्यावर संशय येणार नाही अशाप्रकारे ते संभाषण करायचे’, असे उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकातील अधिकारी असीम तरूण यांनी सांगितले.

काही दिवसांनी जम्मू-कश्मीरमधील गुप्तचर यंत्रणेला या कॉलवर संशय आला. त्यांनी डझनभर कॉल रेकॉर्ड करून ठेवले आणि एटीएसला त्याची माहिती दिली. त्यानंतर एटीएस अधिकाऱ्यांनी विविध भागात छापे टाकून ११ जणांना अटक केली. या सगळ्यांची चौकशी सुरू असून त्यांच्यासोबत अन्य कुणी लोक सहभागी आहेत का याची माहिती तपासली जाणार, असल्याचे त्यांनी सांगितले.

ats-arrested-11-people

 

आपली प्रतिक्रिया द्या