उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये कोल्ह्यांची प्रचंड दहशत पसरली आहे. प्रशासनाच्या सतर्कतेनंतरही रविवारी येथे एका निष्पाप मुलीवर आणि वृद्ध महिलेवर कोल्ह्यांने हल्ला केला. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला, तर वृद्ध महिलेला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी कोल्ह्यांच्या हल्ल्यात 10 निष्पाप मुलांसह एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान प्रशासनातर्फे सातत्याने ड्रोन आणि थर्मल इमेजिंग कॅमेऱ्यांच्या मदतीने लांडग्यांवर लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने एवढा कडक बंदोबस्त केला असला तरी कोल्हे रोज कुठे ना कुठे लोकवस्तीत घुसून लोकांवर हल्लेही करत आहेत. रविवारी एका कोल्ह्यांने 65 वर्षीय महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील महसी तालुक्यातील बाराबिघा कोटिया गावात ही घटना घडली. रविवारी रात्री महिला शौचालयात जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. दरम्यान कोल्ह्यांने त्यांच्यावर हल्ला केला. अशी माहिती पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितली.
एकीकडे 65 वर्षीय महिलेवर कोल्ह्यांनी हल्ला केला असता दुसरीकडे हरेडी परिसरातही अशीच एक घटना घडली. एका निष्पाप मुलीवर कोल्ह्यांने हल्ला केला आहे. ही मुलगी तिच्या आईसोबत झोपली होती. यावेळी कोल्ह्यांने तिच्यावर हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.
कोल्ह्यांचा अद्याप शोध लागलेला नाही
कोल्ह्यांच्या सततच्या हल्ल्यांबाबत स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. स्थानिक लोकांनी वनविभाग आणि जिल्हा प्रशासनावर अनेक आरोप केला. प्रशासनातर्फे एवढा कडक बंदोबस्त असतानाही अद्याप एकाही कोल्ह्यांचा शोध लागलेला नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.