भाजप आमदार आणि एसओ पोलीस स्थानकातच भिडले, एकमेकांचे कपडे फाडले

1870

उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे भाजप आमदार राजकुमार सहयोगी आणि एसओ अनुज सैनी यांच्यात पोलीस स्थानकातच हाणामारी झाली. गोंडा पोलीस स्थानकाचे एसओ आणि अन्य तीन पोलिसांनी माझ्यावर हल्ला केला, असा आरोप सहयोगी यांनी केला आहे. तर एसओ यांनी आधी आमदार सहयोगी यांनी हात उचलला असा आरोप केला. दरम्यान, पोलीस स्थानका बाहेर समर्थकांची मोठी गर्दी जमल्याने वातावरणात तणावपूर्ण झाले होते. यामुळे बड्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली.

एका हिंदी वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, आमदार राजकुमार सहयोगी काही दिवसांपूर्वी पक्षातील कार्यकर्त्यासोबत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्थानकात गेले होते. आमदाराने पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई का केली नाही असा सवाल केल्याने दोन्ही पक्षात हाणामारी झाली. प्रकरणाची माहिती मिळताच डीएम आणि एसएसपी यांनी गोंडा पोलीस स्थानकात धाव घेतली.

गोंडा पोलीस स्थानकाचे चौकीदार बत्तनलाल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आमदार सहयोगी यांनी पोलीस स्थानकात येताच शिवीगाळ सुरू केली. यादरम्यान रागाच्या भरात त्यांनी पोलिसांसमोरच एसओ अनुज सैनी यांच्या कानाखाली मारली. यामुळे हा वाद झाला.

आपली प्रतिक्रिया द्या