वेळीच सुधरा..! अन्यथा ‘राम नाम सत्य है’, लव्ह जिहाद करणाऱ्यांना मुख्यमंत्री योगींचा इशारा

वाढत्या लव्ह जिहादच्या घटनांना आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. या संदर्भात शनिवारी देवरिया येथे निवडणूक प्रचारात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी माहिती दिली, तसेच लव्ह जिहाद करणाऱ्यांना इशाराही दिला.

मुख्यमंत्री योगी म्हणाले की, काल उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. त्यानुसार फक्त लग्नासाठी धर्मातर करणे वैध मानले जाणार नाही असे न्यायालयाने म्हटले. सरकार देखील लव्ह जिहादवर लवकरच अंकुश लावणार आहे.

योगी पुढे म्हणाले की, यासाठी यूपी सरकार कायदा लागू करणार आहे. तसेच यावेळी त्यांनी खरी ओळख लपवून हिंदू मुलींची फसवणूक करणाऱ्या तरुणांना देखील इशारा दिला. जर वेळीच सुधारले नाही तर तुमची ‘राम नाम सत्य है’ची अंतिम यात्रा निघेल, असा इशाराच त्यांनी दिला.

काय म्हणाले न्यायालय?

धर्मांतर संबंधात शुक्रवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी झाली. फक्त लग्नासाठी धर्मांतर करणे वैध असणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला. यावेळी न्यायालयाने विरुद्ध धर्मीय जोडीची याचिका देखील फेटाळून लावली.
एक याचिकाकर्ता मुसलमान, तर दुसरा हिंदू आहे. मुलीने 29 जून, 2020 ला हिंदू धर्माचा स्वीकार केला आणि 31 जुलैला विवाह केला. त्यामुळे फक्त लग्नासाठी हे धर्मांतर केल्याचे स्पष्ट होते असे म्हणत न्यायालयाने यास वैध मानण्यास नकार दिला.
आपली प्रतिक्रिया द्या