संसर्गजन्य रोगांचा धसका; योगी सरकार ‘थुकपट्टी’ रोखणार

279

हिंदुस्थानात कोरोना विषाणूची दहशत कायम असल्याने उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने संसर्गजन्य रोगांचा फैलाव रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारी कार्यालयांच्या फायलीतील पाने थुंकी लावून पलटू नयेत असे स्पष्ट निर्देश सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱयांना देण्यात आले आहेत. रायबरेलीचे मुख्य विकास अधिकारी अभिषेक गोयल यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

सरकारी खात्यांतील अधिकारी-कर्मचारी हे विविध फायलींतील पाने पलटण्यासाठी त्या पानांना थुंकी लावतात. अनेक कर्मचारी-अधिकारी या जुन्या वाईट सवयीपासून दूर झालेले नाहीत. या सवयीमुळे संसर्गजन्य रोग फैलावत असल्याने उत्तर प्रदेशच्या सरकारने कर्मचारी-अधिकाऱयांची ही सवय सोडवण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱयाने सरकारी कागदपत्रांना थुंकी लावण्याचा प्रयत्न करू नये अशी सक्त ताकीद रायबरेलीचे मुख्य विकास अधिकारी अभिषेक गोयल यांनी एका आदेशाद्वारे दिली आहे. थुंकीऐवजी ‘पानी स्पंज’चा वापर करा, असे त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या