धक्कादायक! सिझेरिअन दरम्यान महिलेच्या पोटात राहिला टॉवेल

उत्तर प्रदेशातील देवरियातील एका खासगी रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. गरोदर महिलेच्या सिजेरियन ऑपरेशन दरम्यान तिच्या पोटातच टॉवेल ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या महिलेला त्याचा संसर्ग होऊन तिची गर्भपिशवी खराब झाली. सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.

उत्तर प्रदेशातील देवरियाच्या एका खासगी रूग्णालयात ही घटना घडली आहे. एका गरोदर महिला तिथे उपचार घेत होती. ऑगस्ट महिन्यात ती बाळंतपणासाठी माहेरी गौरीबाजाराला गेली आणि 12 ऑगस्टला एका रुग्णालयात दाखल झाली. तिथे तिचे सिझेरिअन होऊन तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र सिझेरिअननंतर काही दिवसाने तिच्या पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. मात्र तिला अॅनिमिया आजार असल्याचे सांगत डॉक्टर तिच्यावर नोव्हेंबरपर्यंत उपचार करत होते. मात्र आपल्याकडून उपचार होत नसल्याचे लक्षात येताच हर्निया असल्याचे सांगत गोरखपूर येथे जाण्यास सांगितले. मात्र तिथेही उपचार केल्यानंतर तिचे दुखणे थांबले नाही.

सध्या तिच्यावर लखनऊला उपचार सुरु आहेत. पण तिच्या पोटाचे दुखणे वाढले होते. अखेर ती गावी परतली त्यावेळी तिथल्या एकाने गोरखपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखवण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे ती महिला खासगी रुग्णालयात गेली. तिथे 29 जानेवारीला रुग्णालयात भरती झाली आणि 2 फेब्रुवारीला तिच्या पोटाचं ऑपरेशन करण्यात आलं. त्यावेळी तिच्या पोटात टॉवेल आढळले. पोटात टॉवेल राहिल्याने इन्फेक्शन झाले होते. गर्भाशय पूर्णपणे सडले होते. त्यामुळे ते काढावे लागले, आता तिची प्रकृती गंभीर आहे.

बायकोच्या उपचारासाठी त्याने शेतजमीन, दागिने विकले

या महिलेचा पती एक मजूर असून त्यांना तीन लहान मुलं आहेत आणि सध्या तो नातेवाईकांकडे राहतोय. आपल्या बायकोच्या उपचारासाठी या नवऱ्याने शेतही विकल, दागिने विकले आणि उपचारासाठी पैसे जमवले. याप्रकरणी सीएमओ आलोक पांडे यांनी एक चौकशी समिती नेमली आहे.ऑपरेशनदरम्यान महिलेच्या पोटात टॉवेल तसाच राहिला, लवकरच चौकशी करुन रिपोर्ट दिला जाईल. त्या रुग्णालयावर कारवाई केली जाईल असे आश्वासनही देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या