लग्न कोणासोबत करू? चार जणांसोबत पळालेल्या तरुणीला पडला प्रश्न

जगात कोणाला काय वाटेल आणि कोणी काय करेल याचा नेम लागणार नाही. उत्तरप्रदेशात एक अजब घटना समोर आली आहे. एक तरुणी तब्बल चार तरुणांसोबत घरातून पळून गेली. मात्र लग्न नेमकं कोणाशी करायचे याबाबत ती संभ्रमात पडली आणि अखेर पंचायतीने तिचे प्रकरण मार्गी लावले. गावात तिचे हे अजब प्रकरण चर्चेचा विषय ठरले होते.

ही घटना उत्तरप्रदेशातील टांडा येथील अजीमनगर परिसरातील आहे. पाच दिवसांपूर्वी गावातील एक तरुणी चार तरुणांसोबत घरातून पळून गेली होती. या तरुणांनी दोन दिवस या तरुणीला आपल्या नातेवाईकांकडे लपवून ठेवले. मात्र त्यानंतर तरुणीच्या घरच्यांनी तिला शोधून काढले. दरम्यान हे प्रकरण पंचायतीपर्यंत गेले. पंचायतीकडून लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. जेव्हा तरूणीला लग्नाबाबत विचारले यातील कोणत्या मुलाशी लग्न करायचे आहे त्यावर ती नेमके कोणाशी लग्न करायचे हे ठरवू शकत नव्हती.

चौघांपैकी तिच्यासाठी योग्य कोण? नेमकं लग्न कोणाशी करायचे हे तिला कळत नव्हते. कोणता मुलगा तिला जास्त आवडतोय हे ती ठरवू शकत नव्हती, यामुळे तिचे कन्फ्युजन वाढले. विशेष बाब ही आहे की मुलीसोबत पळून गेलेल्या चौघांपैकी एकही स्वत:हून तिच्याशी लग्न करायला तयार नव्हता. या तरुणीने चौघांपैकी एकाला निवडावे अशी अट या तरुणांनी घातली होती. तीन दिवस या प्रकरणावर विचार करुन पंचायतीने चिठ्ठ्या टाकून मुलांची निवड करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत तरुणी आणि त्या चौघांना याची कल्पना दिली. त्यांनाही हा पर्याय योग्य वाटला. पंचायतीच्या निर्णयानंतर चारही तरुणांची नावं असलेल्या चिठ्ठ्या केल्या आणि एका वाटीत ठेवल्या. त्यानंतर एका लहान मुलाला यातली एक चिठ्ठी उचलायला सांगितली. मुलाने चिठ्ठी काढल्यानंतर त्यात ज्या तरुणाचे नाव निघाले त्याच्यासोबत तरुणीचे लग्न ठरले.

आपली प्रतिक्रिया द्या