उत्तर प्रदेशमध्ये ऑनर किलिंग, भावानेच केली बहिणीची हत्या; मृतदेह झाडाला लटकवला

823
प्रातिनिधिक फोटो

बहिण प्रियकरासोबत पळून गेली याचा राग मनात धरून एका भावाने त्याच्या बहिणीची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यात घडली आहे. भावाने बहिणीसोबतच तिच्या प्रियकराची देखील हत्या केली आहे. तसेच त्याला या दोघांची हत्या करताना पाहिलेल्या त्याच्या चुलत भावाचा देखील त्याने खून केला आहे.

विनीत असे त्या नराधम भावाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. विनीतची लहान बहिण सुखिया ही तिचा प्रियकर बंटीसोबत पळून गेली होती. सुखिया व बंटी लग्न करणार होते. मात्र ते एका शेतात लपले असल्याची माहिती विनीतला मिळाली त्यानंतर विनीत व त्याच्या मित्रांनी मिळून त्या दोघांची हत्या केली व त्यांचे मृतदेह झाडाला लटकवले. मात्र हे करताना विनीतचा चुलत भाऊ कुलदीप याने त्याला पाहिले होते. त्याने सर्व प्रकार घरातल्यांना सांगणार असल्याचे विनीतला सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या विनीतने त्याचीही हत्य़ा केली व कुलदीपलाही एका झाडाला लटकवले. सुरुवातीला पोलिसांना सुखिया व बंटी यांनी आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. मात्र कुलदीपचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी घरातल्यांची कसून चौकशी केली असता विनीतने त्याचा गुन्हा कबूल केला.

आपली प्रतिक्रिया द्या