मुलीच्या बॅगेत मिळाले प्रेग्नेसी किट, आई-वडिलांनी आधी गळा आवळला नंतर अॅसिड फेकून ओळख मिटवली

उत्तर प्रदेशातील कौशाम्बीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकवीस वर्षीय मुलीच्या बॅगेत प्रेग्नेसी किट सापडल्याने आई-वडिल हादरले. संतापलेल्या आई-वडिलांनी मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख लपविण्यासाठी त्यावर अॅसिड फेकले. मात्र पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असून याप्रकरणी मुलीच्या आईवडिलांसह चौघांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील तेन शाह अलमाबाद गावातील नरेशने 3 फेब्रुवारी रोजी आपली मुलगी बेपत्ता असल्याचे पोलिसात तक्रार केली. त्यानंतर मंगळवारी मुलीचे छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह गावाच्या बाहेर सापडला. याप्रकरणी पोलीस अधिक्षक बृजेश कुमार श्रीवास्तवने बुधवारी सांगितले की, तपासा दरम्यान कळले की नरेश आणि त्याची पत्नी शोभा देवी 3 फेब्रुवारी रोजी त्यांनी आपल्या मुलीची गळा आवळून हत्या केली होती.

त्यांनी मुलीच्या शरीरावर बॅटरी अॅसिड फेकले होते. नरेशचे भाऊ गुलाब आणि रमेशने मृतदेह लपविण्यास मदत केली होती. नरेशने पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी अनेक मुलांशी फोनवर बोलायची. तिच्याकडे काही प्रेग्नेसी किट मिळाले होते्. ज्यामुळे नरेशला संशय होता की, तिचे बाहेर कोणा मुलासोबत अफेअर सुरु आहे आणि त्यामुळे तो तिच्यावर रागावला होता.