मोबाईवर गेम खेळताना आठ वर्षीय मुलाचा गाडीत गुदमरुन मृत्यू

मथुरेत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोबाईवर गेम खेळताना आठ वर्षाच्या मुलाचा गाडीत गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने मथुरेच्या बरारी गावावर शोककळा पसरली आहे.

उत्तरप्रदेशातील मथुरेतील बरारी गावातील ही घटना आहे. रिंकू अग्रवाल यांचा आठ वर्षीय मुलगा कृष्णा मोबाईलवर गेम खेळता खेळता वडिलांच्या कारमध्ये जाऊन बसला. त्याने आतून कारच्या खिडक्या बंद करुन घेतल्या. कृष्णा कारमध्ये गेम खेळता खेळता बेशुद्ध झाला. रात्री जेव्हा घरातील लोकं झोपायला जात होती त्यावेळी कृष्णा कुठेच दिसत नव्हता.

घरच्यांनी सगळीकडे बरेच तास शोधाशोध केली मात्र कृष्णाचा कुठेच शोध लागला नाही. मात्र रिंकू यांनी त्यांच्या कारमध्ये सहज वाकून पाहिले असता कृष्णा आत बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या हातात मोबाईल होता. घरच्यांनी कारचा दरवाजा खोलून कृष्णाला बाहेर काढले. तो काहीच प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कोणालाच या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. डॉक्टरांनी मुलाचा मृत्यू गुदमरुन झाल्याचे सांगितले. मोबाईलवर खेळता खेळता कृष्णाने आतून दरवाजा बंद केल्याने, दरवाजा लॉक झाला असावा त्यामुळे तो गुदमरला. रिंकू अग्रवाल यांना पाच मुलं आहेत. चार बहिणींनंतर कृष्णा सगळ्यात लहान मुलगा आहे. त्यामुळे सगळ्यांचाच तो लाडका होता.

आपली प्रतिक्रिया द्या