क्रूरपणाचा कळस… महिलेची हत्या करून 15 तुकडे केले, नग्न मृतदेह गोणीत भरला; मुंडकेही गायब

महिला सुरक्षेच्या कितीही टीमक्या वाजवल्या तरीही स्रियांवरील अत्याचार कमी झालेला नाही. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे घडलेल्या एका गुन्ह्यामुळे हे सिद्ध झाले आहे. मेरठ येथे एका प्लास्टिकच्या गोणीत 15 तुकडे केलेला महिलेचा मृतदेह सापडला आहे. मृतदेहावरील मुंडकेही गायब असल्याने ओळख पटू शकलेली नाही. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदसाठी रुग्णालयात पाठवला आहे.

‘लाईव्ह हिंदुस्थान’ने दिलेल्या वृत्तानुसार, मेरठमधील लिसाडी पोलीस स्थानक भागात सो फुटा रोडवर असणाऱ्या फातिमा कॉलनी समोर असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक प्लॅस्टिकची गोणी आज सायंकाळी आढळून आली. कचऱ्याच्या ढिगातच एका महिलेचा नग्न अवस्थेतील मृतदेह होता. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. कचऱ्याच्या ढिगारातच पोलिसांना एक प्लास्टिकची गोणी सापडली. यात महिलेचे 15 तुकडेही आढळून आले. मात्र मुंडके गायब होते. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटू शकली नाही.

हे हत्याकांड अन्य ठिकाणी झाले असावे आणि मृतदेह या भागात फेकून देण्यात आला असावा, असा संशय पोलिसांना आहे. तूर्तास पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पातबवला आहे. याबाबत मेरठचे एसएसपी अजय साहनी यांनीही माहिती दिली असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या