चर्चा तर होणार ना भाऊ..! पाणीपुरी खाता-खाता प्रेमात पडली, ठेल्यावाल्यासोबत फरार झाली

3170

उत्तर प्रदेशमधील मिरझापुर जिल्ह्यात अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. येथे आंबट-गोड पाणीपुरी खाता-खाता एक अल्पवयीन विद्यार्थिनी प्रेमात पडली आणि ठेल्यावाल्यासोबत फरार झाली. आंबट-गोड प्रेमाचा हा मामला सध्या मिरझापुरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, एक अल्पवयीन मुलगी नेहमीच पाणीपुरी खाण्यासाठी एकाच ठेल्यावर जात होती. आंबट-गोड पाणीपुरी खाता-खाता या मुलीच्या हृदयात प्रेमाचा अंकुर फुटला. पाणीपुरी विकणारा आणि खाणारी मुलगी एकमेकांच्या एवढ्या प्रेमात पडले की ठेल्यावाल्याने आपल्या दुकानाचा गाशा गुंडाळला आणि मुलीला घेऊन फरार झाला.

पाणीपुरी विकणारा तरुण मूळचा झांशीचा राहणारा आहे. मिरझापुर येथील ठेला बंद करून मुलीला घेऊन त्याने थेट झांशी गाठली. मात्र घरी पोहोचण्यापूर्वी पोलीस स्वागतासाठी तयार असल्याचे पाहून त्याला धक्का बसला. पोलिसांनी मुलीला तिच्या घरी पाठवून दिले, तसेच तक्रार न आल्याने पाणीपुरी विकणाऱ्या तरुणावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र त्याला समज देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या