प्रेमात उचललं मोठं पाऊल, 8 मुलांची आई प्रियकरासोबत पळाली…

असे म्हणतात की प्रेम हे आंधळे असतं, प्रेमात जात, धर्म आणि वय पाहिलं जात नाही. याचेच एक उदाहरण आता उत्तर प्रदेशात पाहायला मिळालं आहे. येथील 8 मुलांची आई आपल्या प्रियकरासोबत घरातील वस्तू घेऊन पळाली आहे. प्रियकरासोबत घर सोडून गेलेल्या या आईने आपल्या एका मुलालाही सोबत नेलं आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचं लग्न 30 वर्षाआधी उत्तर प्रदेशमधील शामली येथे राहणाऱ्या एका व्यक्तीशी झालं होत. या जोडप्याला आठ मुले होती, त्यातील चार मुलांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी महिलेचा पती आजारी नातेवाईकासह देहरादून येथे रुग्णालयात गेला होता. यावेळी महिलेने आपल्या प्रियकरासोबत घरातून पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

महिला आपल्या तीन मुलांना घरीच सोडून गेली आहे. मात्र आपल्या सर्वात लहान मुलाला ती सोबत घेऊन गेली आहे. महिलेचा पती सायंकाळी घरी आला असता पत्नी आणि घरातील काही सामान गायब असल्याचे पाहून त्याला धक्काच बसला. महिलेच्या पतीने मुलांना आई कुठे गेली आहे, असे विचारले असता त्यांनी सांगितलं की, ‘आई एका व्यक्तीसोबत गेली आहे.’ पीडित इसमाने सांगितलं की, पंधरा दिवसाआधी देखील त्याची पत्नी गावातील तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र गावातील काही जबाबदार लोकांनी तिची समजूत काढल्यानंतर ती पुन्हा घरी परतली होती.

आपली प्रतिक्रिया द्या