मदत करा, नाहीतर जीव देईन; छेडछाडीला कंटाळून मुलीची धमकी

28

सामना ऑनलाईन । लखनऊ

उत्तर प्रदेशमध्ये एका मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्येची धमकी दिल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली आणि छेडछाड करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील दादरी भागातील असून, पोलिसांनी आरोपी तरुणाला दिल्ली-गाझियाबाद सीमेवरली बृज विहार कॉलनीमधून अटक केली आहे.

पीडित मुलगी बीएएमएसचे शिक्षण घेत आहे. कॉलेजमध्ये जात असताना गेल्या दोन वर्षांपासून आरोपी मुलगा त्रास देत होता. मुलाचे नाव मनीष वशिष्ठ आहे. पीडित मुलीने आरोपीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने तरुणाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने आत्महत्या करेन अशी धमकी ट्वीट करुन दिली. या ट्वीटमध्ये मुलीने पोलिसांना टॅग केले. ट्वीटमध्ये मुलीने, ‘कृपया मला वाचवा, नाहीतर मी आत्महत्या करेन. माझ्याकडे हाच शेवटचा पर्याय राहिला आहे. आरोपी मुलगा माझ्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहे. तक्रार मागे घेतली नाही तर तो माझी हत्या करेल.’ असे नमूद केले होते. पोलिसांनी ट्वीट पाहून तातडीने कारवाई करुन मुलाला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या