उत्तर प्रदेश- रोडरोमिओंचा पाठलाग स्कॉलर तरुणीच्या जिवावर, बाईक अपघातात मृत्यू

735
death

एका हुशार आणि अमेरिकेत स्कॉलरशिपवर शिकणाऱ्या तरुणीचा एका बाईक अपघातात मृत्यू झाला आहे. रोडरोमिओंनी केलेला पाठलाग तिच्या जिवावर बेतल्याची ही घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे घडली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणीचं नाव सुदीक्षा भाटी असं आहे. अमेरिकेत शिकणारी सुदीक्षा सुट्ट्यांमुळे तिच्या घरी आली होती. रविवारी ती तिच्या काकांसोबत बाईकने औरंगाबाद येथे जात होती. वाटेत एका बुलेटवर स्वार असणाऱ्या रोडरेमिओंनी तिची छेड काढायला सुरुवात केली. बुलेटवरून त्यांच्या बाईकच्या आसपास फिरून तिच्यावर अश्लील टिपण्णी करू लागले. तेवढ्यावरच न थांबता ते दोघेही बाईकचे स्टंटही करू लागले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तिचे काका शांतपणे बाईक पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्या रोडरोमिओंनी त्यांची बुलेट पुढे नेऊन बाईकच्या समोर आडवी घातली. त्यांच्या या कृतीची कल्पना न आल्याने सुदीक्षाच्या काकांनी अचानक बाईकला ब्रेक मारला. पण, वेगात असलेली बाईक जोरदारपणे बुलेटला धडकली आणि अपघात झाला.

sudiksha-ghati

या अपघातात गंभीर जखमी झालेली सुदीक्षा जागीच गतप्राण झाली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतमबुद्ध नगरमध्ये राहणाऱ्या सुदीक्षाची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. सुदीक्षाचे वडील ढाबा चालवतात. तरीही प्रतिकूल परिस्थितीत तिने शिक्षण घेतलं. बारावीत बोर्डात पहिली आलेली सुदीक्षा त्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिपवर अमेरिकेत गेली होती.

आपली प्रतिक्रिया द्या