क्षणात होत्याचं नव्हतं झालं…आईच्या मृत्यूचा धक्का बसला अन 2 भाऊ व बहिणीने सामूहिक गळफास घेतला

2427

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आईच्या मृत्यूचा धक्का सहन न करू शकल्याने दोन भाऊ आणि एका बहिणीने सामूहिक गळफास घेऊन जीवन संपवले. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली आहे. यात त्यांनी आम्ही आमच्या मर्जीने आत्महत्या करत असून आईच्या जाण्याने खचलो असल्याचे म्हटले.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, लखीमपूर पोलीस स्थानक भागातील  शांतीनगर येथे ही घटना घडली आहे. मृतांचे वडील आदित्य कामावरून परत आले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. बराच वेळ दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दरवाजा उघडला तेव्हा त्यांना दोन मुलं आणि मुलीचा मृतदेह लटकताना दिसला.

नागेश्वर (वर -35), विवेक (वय – 28) आणि मुलगी (वय – 25) या तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या आईचे निधन झाले होते, असे मृतकांचे वडील आदित्य यांनी सांगितले. आईच्या आठवणीत त्यांनी खाणे-पिणे सोडले होते आणि लग्न करण्यासही नकार दिला होता.

फोटो छापू नका
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळून आली. यात त्यांनी आम्ही आमच्या मर्जीने आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. तसेच तिन्ही बहीण-भावाचे शवविच्छेदन करू नका आणि वृत्तपत्रात फोटो छापू नका असेही सुसाईड नोटमध्ये लिहिले होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या