मृत प्रियकराच्या फोटोसोबत महिला घेणार सात फेरे  

1200

यूपीच्या अलिगडमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे एका विधवा महिलेने तिच्या प्रियकराच्या फोटोशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिलेच्या प्रियकराचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. या महिलेचे म्हणणे आहे की, तिने आपल्या प्रियकराला वचन दिल होते. यामुळे तिला त्याच्या फोटोशी लग्न करायचे आहे.

या अनोख्या लग्नाला मंदिर समिती आणि महिलांच्या कुटुंबीयांचा विरोध आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, मंदिर समितीचे लोक या लग्नाला विरोध करीत आहेत. हे लग्न थांबवण्यासाठी या समितीने याबाबत एसडीएम पोलीस ठाण्याला पत्र लिहून मदतीसाठी विनंती केली आहे. महिलेने सांगितले आहे की, 8 नोव्हेंबर रोजी ती आपल्या प्रियकराच्या फोटोसह बडा महादेव मंदिरात सात फेरे घेणार आहे.

दरम्यान, या महिलेच्या पतीचा 3 वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. या महिलेला चार मुलेही आहेत. तिच्या प्रियकराचेही दोन वर्षांपूर्वी निधन झाले. महिलेने काही नातेवाईक आणि जवळच्या लोकांना आपल्या लग्नाची आमंत्रण पत्रिका पाठवली आहे. विवाहादरम्यान सुरक्षेसाठी महिलेने पोलिसांकडून मदत मागितली आहे. याप्रकरणी पोलिसांनीही महिलेला सुरक्षा पुरवणार असल्याचे सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या