अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाला, 23 जणांना मंत्रिपदाची शपथ

2074
up-cabinate

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा राज्यातील कॅबिनेटचा विस्तार कधी होणार असा प्रश्न सातत्याने होत असताना अखेर बुधवारी 23 जणांना शपथ देण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असून यामध्ये 6 कॅबिनेट, 6 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 11 राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली.

मंत्रिमंडळ विस्तारात विविध समाजातील प्रतिनिधींना स्थान देण्यात आले आहे. यामुळे जातीय समीकरण सांभाळण्यात आल्याचे देखील वृत्तवाहिंन्यांवरून देण्यात आलेल्या वृत्तात म्हटले गेले आहे. योगी सरकारमध्ये संधी मिळालेल्या 23 मंत्र्यांपैकी 6 ब्राह्मण, 2 क्षत्रिय, 2 जाट, 1 गुर्जर, 3 दलित, 2 कुर्मी, 1 राजभर, 1 गडरिया, 3 वैश्य, 1 शाक्य और 1 मल्लाह समाजातून येतात.

कॅबिनेट मंत्री म्हणून महेंद्र सिंह, भूपेंद्र सिंह चौधरी, राम नरेश अग्निहोत्री, सुरेश राणा, अनिल राजभर, कमला रानी यांनी शपथ घेतली. नील कंठ तिवारी, कपिल देव अग्रवाल, सतीश द्विवेदी, अशोक कटारिया, श्रीराम चौहान आणि रवींद्र जायसवाल यांना राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) पद देण्यात आले आहे.

याशिवाय अनिल शर्मा, महेश गुप्ता, आनंद स्वरूप शुक्ला, विजय कश्यप, गिराज सिंह धर्मेश, लाखन सिंह राजपूत, नीलिमा कटियार, चौधरी उदय भान सिंह, चंद्रिका प्रसाद उपाध्याय, रामशंकर सिंह पटेल आणि अजीत सिंह पाल यांनी राज्य मंत्री म्हणून शपथ घेतली.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आजच विभागांची वाटणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही मंत्र्यांकडचे विभाग बदलले जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री योगी आज संध्याकाळी 4 वाजता नव्या मंत्र्यासोबत बैठक घेण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या मंत्र्यांसमोर सरकार दिशा स्पष्ट करण्यात येईल. त्यानंतर योगी एक पत्रकार परिषद बोलावतील अशी चर्चा देखील आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारा पूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपले सरकारी निवासस्थान 5 कालीदास मार्ग येथे भाजपच्या प्रदेश संघटक मंत्री सुनील बंसल यांच्यासोबत संभावित मंत्र्यांसोबत एक बैठक घेतल्याची माहिती देखील मिळते आहे.

आपली प्रतिक्रिया द्या