यूपीच्या मंत्रिमंडळाने ‘लव्ह जिहाद’बाबत काढला अध्यादेश, लवकरच करणार कायदा

उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने लव्ह जिहादसंदर्भातील अध्यादेश काढला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा अध्यादेश मंजूर झाला. उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केले होते की, आम्ही लव्ह जिहाद संदर्भात नवीन कायदा बनवू. जेणेकरून बळजबरीने होणारे विवाह थांबवता येतील.

योगी सरकारचे मंत्री मोहसिन रझा हे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, ‘एका मिशन प्रमाणे मुलींना भुरळ घालून धर्मांतर करण्याचे हे प्रकार आता चालणार नाही. हा त्या जिहादींना संदेश आहे जे अशा प्रकारे मुलींचे धर्मांतर करतात. अशा लोकांना तुरूंगात टाकण्याची संपूर्ण तयारी आहे.’

उत्तर प्रदेशच्या देवरिया येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम लव्ह जिहादविरूद्ध कायदा करण्याविषयी बोलले होते. ते म्हणाले होत की, ‘धर्मपरिवर्तन करणे बेकायदेशीर आहे. राज्य सरकार यासंदर्भात कडक तरतुदींसह कायदा आणेल आणि मग असे कृत्य करणाऱ्यांचे राम नाव सत्य होईल.’ त्यांच्या या घोषणेनंतर इतर भाजप शासित राज्यांमध्येही लव्ह जिहादविरोधात कायदे करण्याची मागणी पुढे येताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या