कोरोना झाल्याच्या संशयाने तरुणीला बसमधून उतरवले, हृदयविकाराच्या झटक्याने तरुणीचा मृत्यू

3090
death

कोरोना झाल्याच्या संशयाने एका तरुणीला बसमधून बाहेर काढल्याची घटना उत्तर प्रदेश येथे घडली आहे. वाटेत या तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अंशिका असं या तरुणीचं नाव आहे. 15 जून रोजी उत्तर प्रदेशच्या बसमधून अंशिका तिच्या आईसोबत नोएडा ते शिकोहाबाद असा प्रवास करत होती. दुपारी 2च्या सुमाराला ती बसमध्ये बसली. त्यावेळी तिची तब्येत ठीक होती. मात्र, काही वेळाने प्रचंड उष्णतेमुळे तिला त्रास झाला आणि ती बेशुद्ध झाली. ती बेशुद्ध पडल्याचं पाहून बस कंडक्टरला ती कोरोनाबाधित असल्याची शंका आली. त्यामुळे कंडक्टर आणि बसचालकाने तिच्यावर टिपण्या करायला सुरुवात केली. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तिला मथुरा येथील टोल प्लाझाजवळ बसमधून उतरवलं.

तिच्या आईने तातडीने वैद्यकीय मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. तिच्या शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं आढळलं. या प्रकरणी अंशिकाच्या कुटुंबीयांनी उत्तर प्रदेश बससेवेच्या चालक आणि कंडक्टरवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. पण, अंशिकाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला असल्याने कंडक्टरविरोधात गुन्हा दाखल करता येणार नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या