उत्तराखंडमधील मंत्री सतपाल महाराज यांना कोरोनाची लागण; मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ क्वारंटाईन

962

उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यसह संपूर्ण मंत्रिमंडळ होम क्वारंटाईन झाले आहे. सतपाल महाराज यांची कोरोना चाचणीचा रिपोर्ट येण्याच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सतपाल महाराज यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. याच्या एक दिवस आधी शनिवारी त्यांची पत्नी अमृता रावत यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सतपाल महाराजांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या सुमारे 17 जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. दरम्यान, सतपाल महाराज मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित झाल्यानंतर मंत्रिमंडळातील नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या