बरेली : लग्नाला निघालेल्या मंत्र्याच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू

23
faridpur-car-accident

सामना ऑनलाईन । बरेली

लग्नाला उपस्थित राहण्यासाठी म्हणून कारने गोरखपूरला निघालेल्या अंकुर पांडे आणि अन्य दोघांचा ट्रकसोबत झालेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. तर आणखी एक जण जखमी झाला आहे. अंकुर पांडे हा उत्तराखंडचे मंत्री अरविंद पाडें यांचा मुलगा आहे. या वृत्ताने साऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

अंकुर पांडे खासगी गाडीने गोरखपूर येथे लग्नाला उपस्थित राहण्यासाठी निघाला होता. त्याच्यासोबत अन्य मंडळी देखील होती. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास फरीदपूर येथे पोहोचलेल्या कारची ट्रकसोबत धडक झाली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे. जखमीवर उपचार सुरू असून अपघाताची चौकशी करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या