तरुणीला धावत्या कारच्या बोनेटवर बसून व्हिडीओ करणं पडलं महागात, पोलिसांनी आकारला 17 हजारांचा दंड

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील एक विचित्र घटना समोर आली आहे. धावत्या कारच्या बोनेटवर बसून आपला व्हिडीओ बनवणाऱ्या आणि तो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी तिच्याकडून 17 हजार रूपयांचा दंड आकारला आहे. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रयागराज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने कंपनी बाग जवळ विना हेल्मेट बाईक चालवताना तिचा व्हिडीओ अपलोड केला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वर्णिका चौधरी या तरुणीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 15 हजार 500 रूपये आणि अन्यसाठी 1500 असे दंड आकारण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी अयोध्यामध्ये एक कारच्या बोनटवर बसून स्टंट करणं दोन महिलांना चांगलेच महागात पडले आहे. या दोन्ही महिलांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांनी सांगितले की, कार मालकाला 18 हजारांचा दंड आकारला आहे.

खरंतर, लग्नाआधी वेडिंग फोटोशूट हा एक ट्रेण्ड सुरू झाला आहे. लोकं आपले वेगळेपण दाखविण्यासाठी काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यांत ते नियंमांचीही पर्वा करत नाहीत आणि नंतर त्यांच्यावर दंड भरण्याची वेळ आली की पश्चाताप करत बसतात. आधी पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.