भावा बहिणीने एकमेकांशी लग्न केलं, सापासारखं मूल जन्माला आलं

उजबेकिस्तानमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. बहीण भावाने एकमेकांशी लग्न केलं. या दोघांचं जे बाळ जन्माला आलं ते अत्यंत विचित्र स्वरुपाचं होतं. या बाळाची त्वचा सापासारखी दिसत होती. अंगावर माशांच्या खवल्याप्रमाणे डाग होते. हे मूल जन्माला आल्याच्या काही तासातच मृत्यूमुखी पडलं होतं. या जोडप्यातील महिलेचं पूर्वी एक लग्न झालं होतं आणि तिला पहिल्या नवऱ्यापासून एक मूल आहे. ते मूल सामान्य होतं, मात्र या महिलेला भावापासून झालेलं हे विचित्र होतं.

इंग्लंडमधील वर्तमानपत्र ‘मिरर’ ने दिलेल्या बातमीत म्हटलंय की उजबेकिस्तानच्या डस्टीक प्रांतात राहणाऱ्या बहीण भावाने एकमेकांशी लग्न केलं. लग्नानंतर महिलेने बाळाला जन्म दिला. ऑपरेशन थिएटरमध्ये ज्यांनी ज्यांनी हे बाळ पाहिलं ते घाबरले होते. या बाळाला स्पर्श करायलाही कोणी तयार होत नव्हतं. या बाळाला बरेच आजार होते. बाळाची त्वचा ही सापासारखी होती. त्वचा खडबडीत होती आणि त्यावर माशाच्या खवल्यांप्रमाणे डाग होते. या बाळाला इश्थ्योसिस कॉग्नेशिया नावाचा विकार होता. हा विकार अत्यंत दुर्मिळ असून बहीण भावाने एकमेकांशी लग्न केल्यानं झालेल्या गुणसूत्रीय गुंतागुंतीमुळे झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.