असा असेल कोहलीचा संभाव्य संघ, हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया वन डे मालिका उद्यापासून

team-india-nz

‘टीम इंडिया’च्या बहुचर्चित ऑस्ट्रेलिया दौऱयाला शुक्रवार, 27 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. या द्विपक्षीय मालिकेत प्रथम तीन सामन्यांची वन डे, त्यानंतर टी-20 आणि मग कसोटी मालिका होणार आहे. एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संभाव्य अंतिम 11 खेळाडूंना संघ कोणता असेल यावर एक नजर टाकूया.

हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान पहिल्या एकदिवसीय सामन्यास सुरुवात होणार आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर होणाऱया या सामन्यात ‘टीम इंडिया’ उपकर्णधार रोहित शर्माशिवाय मैदानात उतरणार आहे. त्यामुळे शिखर धवनच्या साथीला सलामीला मयांक अग्रवाल येण्याची दाट शक्यता आहे. संघात लोकेश राहुलचादेखील समावेश असेल, मात्र रिषभ पंत नसल्याने यष्टिरक्षणाची जबाबदारीही राहुलवरच राहील. त्यामुळे तो मधल्या फळीत फलंदाजीला उतरू शकतो.

तिसऱया क्रमांकावर अर्थातच कर्णधार विराट कोहली फलंदाजीला येईल. तो नेहमी याच क्रमांकावर फलंदाजी करतो. महत्त्वाच्या चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर की राहुल खेळेल? हे बघावे लागेल. हार्दिक पांडया सहाव्या क्रमांकावर पाठवले जाऊ शकते. हार्दिकने आयपीएलच्या 13व्या हंगामात गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे त्याचा ऑस्ट्रेलिया दौऱयावर अष्टपैलू खेळाडूचा वापर होतो की नाही हे बघावे लागेल. गोलंदाजीत अष्टपैलू रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराह असा प्रतिभावान ताफा कोहलीच्या दिमतीला असेल.

– हिंदुस्थानचा संभाव्य संघ – शिखर धवन, मयांक अग्रवाल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), हार्दिक पांडय़ा, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

– ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ- अॅरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, एलेक्स पॅरी (यष्टिरक्षक), मार्क्स स्टोयनीस, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्वै, अॅडम झम्पा, जोश हेजलवूड.

आपली प्रतिक्रिया द्या