व्ही मराठा बनले चॅम्पियन

सामना ऑनलाईन, मुंबई

मिर्ची ग्रुप व गणेशगल्ली मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत व्ही मराठा क्रिकेट संघाने चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. यावेळी मुंबई हिटर संघाला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. शिवसेनेचे आमदार अजय चौधरी, शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले.

शाखाप्रमुख किरण तावडे यांच्या पुढाकारामुळे घेण्यात आलेल्या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला. मुंबईचा राजा वॉरियर व याशिका फायटर या संघांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. हर्षल राणेची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. तसेच वैभव पाटकर सर्वोत्तम फलंदाज तर नितीन दळवी सर्वोत्तम गोलंदाज ठरला. स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी म्हणून योगेश शिंदेला गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी युवा सेनेचे धीरज जैन, खजिनदार प्रथमेश कदम यांनी प्रचंड मेहनत घेतली.