राज्यात 3 कोटी 54 लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण, संपूर्ण देशात महाराष्ट्र अव्वल स्थानावर

कोरोनाच्या लाटेचा संसर्ग कमी होत असला तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राने लसीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त वेगाने व अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखला असून आतापर्यंत साडेतीन कोटींहून लसीकरणाचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्राने संपूर्ण देशासमोर लसीकरणाचा आदर्श निर्माण केला आहे.

डेल्टा प्लस आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन लसीकरण हा  सर्वात प्रभावी उपाय असल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे दर महिन्याला तीन कोटी लसींची मागणी केली आहे. दररोज 15 लाख लोकांचे लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे. त्यामुळे केंद्राने दर महिन्याला तीन कोटी लसींचे डोस उपलब्ध करून दिल्यास संपूर्ण राज्यात  लसीकरण पूर्ण होऊन सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होऊन कोरोनाचा धोका कमी होईल असे राज्याचे आरोग्य मंत्री  राजेश टोपे म्हणाले.

देशात महाराष्ट्र अव्वल स्थानी

आरोग्य विभागाकडील 7 जुलैच्या आकडेवारीनुसार राज्यात 3 कोटी 54 लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले  आहे. संपूर्ण देशात लसीकरणाचा हा उच्चांक आहे. राज्यात कोरोना अद्याप आहे. त्यातच नव्याने डेल्टा प्लस रुग्ण व म्युकरमायकेसिसचे रुग्ण आढळले आहेत. केंद्राने राज्याला दरमहा तीन कोटी डोस दिल्यास राज्यातील लसीकरण पूर्ण होईल- राजेश टोपे, आरोग्य मंत्री

आपली प्रतिक्रिया द्या