लसीअभावी मुंबईत आज लसीकरण बंद

मुंबई महापालिकेला केंद्र सरकारकडून लसीकरणासाठी पुरेसा लससाठा उपलब्ध न झाल्यामुळे उद्या, शुक्रवार 9 जुलैला मुंबई महापालिकेची आणि सरकारी लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेअंतर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबईतील राज्य व केंद्राची 20, तर मुंबई महानगरपालिकेची 283 अशी एकूण 303 लसीकरण केंद्रे शुक्रवार, 9 जुलै रोजी बंद राहणार आहेत. लसींचा साठा ज्या प्रमाणात उपलब्ध होईल, त्यानुसार मुंबईकरांना त्याची माहिती देऊन लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकरांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या