पोलिसांनी लावला वांबोरी घाटातील लुटमारीचा छडा

74
maharashtra-police2

सामना प्रतिनिधी । राहुरी

वांबोरी घाटात लुटमार करणा-यांनी विक्री केलेला मोबाईल गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्याने या घटनेतील गुन्हेगारांचे नावे उघड झाली आहेत.

12 जुलैला राञीच्या वेळी वांबोरी घाटात लुटमारीची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. वांबोरी येथील रहिवासी पंकज नबरिया यांना अडवून 6 हजार रूपयांची रोकड व 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल हा ऐवज तिघा लुटारूंनी चोरून नेला होता. या घटनेनंतर वांबोरी घाटातील वाढती गुन्हेगारी चव्हाट्यावर आली होती.

जिल्हा पोलीस प्रमुख इशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने या घटनेचा तपास सुरू केला असता लुटीतील १० हजार रूपयांचा मोबाईल वांबोरी पासुन जवळच असलेल्या गुंजाळे येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. आज मंगळवारी गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकातील मनोज गोसावी, रवींद्र कर्डीले, आण्णा पवार, संतोष लोंढे, सचिन आडबल, दिपक शिंदे, रवी सोनटक्के, संभाजी कोतकर, मेघराज कोल्हे या पोलिसांनी गुंजाळे येथे जावून चोरीतील मोबाईल बाळगणा-या प्रसाद चेंडवाल यास ताब्यात घेतले.

तपासाअंती हा मोबाईल विकास हनवत, कृष्णा शिंदे, राहणार काञड तालुका राहुरी तसेच रवी बर्डे, राहणार मोरेचिंचोरे तालुका नेवासा यांच्याकडून विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने या तिघांचा शोध घेतला माञ आज मंगळवारी सायंकाळ पर्यंत गुन्हेगार सापडु शकले नाहीत.चोरीचा मोबाईल विकत घेणा-याला एम.आय.डी.सी.पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

घाटात लुटमार करणारे दोघे वांबोरी पासुन जवळच असलेल्या काञड येथील तर चोरीचा मोबाईल घेणारा गुंजाळे येथील असल्याने घाटातील लुटमारीत स्थानिक गुन्हेगारांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या