वंचितची 22 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

624

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी आघाडीच्या 22 उमेदवारांची पहिली यादी घोषित केली. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरमधून डॉ. आनंद गुरव, दक्षिण कोल्हापुरातून बबनराक ऊर्फ दिलीप पांडुरंग ककाडे तर कराड दक्षिणमधून बाळकृष्ण शंकर देसाई यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे.

उमेदवारांच्या नावाची घोषणा करताना वंचितने उमेदकारांसमोर त्यांच्या जातीचा उल्लेख केला आहे. आपण विधानसभा निवडणूक रिंगणात वंचित समाजातील दुर्बल, अल्प लोकसंख्येच्या अलुतेदार- बलुतेदारांना उतरविल्याचे आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

वंचितची यादी
सुरेश जाधव (शिराळा), डॉ. बाळासाहेब चव्हाण (कोरेगाव), दीपक नारायण शामदिरे (कोथरूड), अनिल शंकर कुऱहाडे (शिवाजीनगर), मिलिंद काची (कसबा पेठ), शहानवाला जब्बार शेख (भोसरी), शाकीर इसालाल तांबोळी (इस्लामपूर), किसन चव्हाण (पाथर्डी-शेवगाव), अरुण जाधव (कर्जत-जामखेड), सुधीर शंकरराव पोतदार ( औसा), चंदूलाल ककटुजी मेश्राम (ब्रह्मपुरी), अरविंद सांडेकर (चिमूर), माधक कोहळे (राळेगाव), शेख शफी अब्दुल नबी शेख (जळगाव), लालसू नागोटी (अहेरी), मणियार राजासाब ( लातूर शहर), नंदकिशोर कुयटे (मोर्शी), ऍड. अमोद बाकने (करोरा), अशोक विजय गायकवाड (कोपरगाव).

वंचितचे सचिव भाजपच्या वाटेवर
वंचित आघाडीचे राष्ट्रीय सचिव गोपीचंद पडळकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात विचारले असता आंबेडकर यांनी ही चर्चा फेटाळून लावत पडळकर हे आघाडीसोबत असल्याचा दावा केला.

आपली प्रतिक्रिया द्या