‘वंचित’मुळे गेवराईत राष्ट्रवादीच्या विजयसिंह पंडित यांची वाटचाल बिकट

6039

गेवराई विधानसभा मतदावर संघात राष्ट्रवादीने जोर लावला आहे. राष्ट्रवादीची उमेदवारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांना दिली गेली. खुद्द शरद पवार यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. विजय सिंह पंडित हे ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणात कारवाई केलेल्या माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे लहान भाऊ आहेत. या मतदार संघात वंचित आघाडीने विष्णू देवकते यांना पुढे केल्याने विजयसिंह पंडित यांची वाटचाल बिकट झाली आहे.

गेवराई मतदार संघात मोठी चुरस निर्माण होऊ शकते. मात्र या लढाईत राष्ट्रवादी ला वंचित आघाडीमुळे मोठा हादरा सहन करावा लागणार आहे. वंचित आघाडीने विष्णू देवकते यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. गेल्या तीन वर्षा पासून देवकते सामाजिक कामात अग्रेसर आहेत. या मतदार संघात विष्णू देवकते यांच्यामुळे राजकीय समीकरण बिघडणार आहेत. आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या विजयसिंह पंडित यांची वाट सध्या तरी वंचित आघाडीने बिकट केली आहे. त्याच्या एका मेळाव्याने वंचित आघाडी एकजूट झाले आहेत. सामान्य माणूस वंचित आघाडीकडे आकर्षित होत असल्यामुळे त्याचा थेट फटका राष्ट्रवादीला बसणार आहे. प्रस्थापित मतदार आज विजयसिंह पंडितासोबत असले तरी सामान्य माणूस मात्र त्याच्या पासून कोसो दूर आहे. गेवराई मतदार संघ नेहमी प्रामाणिक माणसाच्या पाठीशी उभा राहत आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या