वंदे मातरम इस्लाम विरोधात नाही, मुस्लिम खासदाराचे मत

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक पार पाडल्यानंतर नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पाडला. या शपथविधीत जय श्रीराम, वंदे मातरम आणि अल्लाहू अकबरच्या घोषणा बाजी झाल्या. तेव्हा काही खासदारांनी वंदे मातरम हे इस्लाम विरोधी असल्याचे म्हटले व वंदे मातरम म्हणणार नाही असा पवित्रा घेतला. परंतु एका मुस्लिम खासदाराने वंदे मातरम ही घोषणा इस्लाम विरोधी नसल्याचे म्हटले आहे.

लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांनी वंदे मातरम ही घोषणा इस्लाम विरोधी नसल्याचे म्हटले आहे. तसेच आपण ज्या भागातून आलो आहोत तिथे प्रत्येक मोठ्या शासकीय कामाची सुरूवात राष्ट्रगीताने होते तर सांगता वंदे मातरम गाण्याने होते असेही फैजल यांनी म्हटले आहे. आज तक या वृत्तवाहिनीशी बोलतना त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. लक्षद्वीपमधील इमामांनी वंदे मातरम इस्लाम विरोधी असल्याचा फतवा कधीच काढला नसल्याचे त्यांनी म्हटले.

तसेच कुराणमध्येही असे काहीच म्हटले नसल्याचे त्यांनी सांगितले. कुराणमध्ये प्रत्येक धर्माचा आदर राखणे सांगितल्याचे खासदार फैजल यांनी म्हटले.