‘वंदे मातरम’ बोलणार नाहीत त्यांना देशात राहण्याच्या अधिकार नाही!

287

जे लोक ‘वंदे मातरम’ बोलणार नाहीत त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, असे विधान केंद्रीय मंत्री प्रतापचंद्र सारंगी यांनी केले आहे. भुवनेश्वर येथे आयोजित जनजागरुकता सभेत ते बोलत होते. त्यांच्या विधानावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

कश्मीरमधून 370 कलम हटवून विशेष दर्जा रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱया काँग्रेस पक्षावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले,‘370 कलम रद्द केल्यामुळे टुकडे गँग आणि दहशतवाद्यांना समर्थन देणाऱ्या विशेष दुःख झाले आहे. 370 कलम हटवल्यामुळे जग आपले कौतुक करत आहे. पण देशातील काही लोक सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या