प्रसिद्ध अभिनेत्रीला देहविक्रीच्या आरोपांखाली अटक

30

सामना ऑनलाईन । चेन्नई

चेन्नई पोलिसांनी एका प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक केली आहे. अभिनेत्रीवर देहविक्रीच्या व्यवसायामध्ये सहभागी होण्याचा आरोप लगावण्यात आला आहे. ‘वानी रानी’ या प्रसिद्ध तामिळ सिरियलमध्ये काम करणारी अभिनेत्री संगिता हिला चेन्नईच्या पानायूर येथील एका खासगी रिसॉर्टमधून चालणाऱ्या देहविक्रीच्या व्यवसायामध्ये सहभागी असल्याचा आरोप करत पोलिसांनी अटक केली.

टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी मिळालेल्या माहितीनंतर त्यानंतर रिसॉर्टवर छापा टाकला. पोलीस तपासामध्ये या रिसॉर्टमधून चालणाऱ्या देहविक्रीच्या व्यवसायामध्ये अनेक तरुण अभिनेत्रींचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. यात अभिनेत्री संगिता ही एक असून तामिळ चाहत्यांमध्ये ती चांगलीच लोकप्रिय आहे. संगिताने ‘वानी रानी’ यासह अनेक मालिकांध्ये काम केले आहे. तसेच ‘करुप्पू रोजा’ नावाच्या चित्रपटामध्ये तिने काम केले आहे. पोलिसांनी अभिनेत्रीसह सुरेश नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. तसेस देहविक्रीच्या दलदलीतून तीन अभिनेत्रींची सोडवणूकही करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

देहविक्री आणि इंडस्ट्री

देहविक्रीच्या आरोपांखाली अटक झालेली संगिता पहिलीच अभिनेत्री नसून या आधीही अनेक अभिनेत्री या दलदलीत सापडल्या आहेत. अभिनेत्री शर्लिन चोप्रा, श्वेता प्रसाद बसू, मिष्टी मुखर्जी, कन्नड अभिनेत्री यमुना, भुवनेश्वरी, तामिळ अभिनेत्री सायरा बानू, ऐश अंसारी, नीतू अग्रवाल, दिव्यी श्री. कॅरोलीन मारिया असन यांच्यावरही देहविक्रीचा आरोप करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या